पिरंगुट -मास्क न लावता फिरणाऱ्या 39 जणांवर पौड पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. मुळशी तालुक्यातील विविध भागात गस्त घालत असताना पौड पोलिसांनी ही कारवाई दिली.
पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे, श्रीकांत जाधव, रेखा दुधभाते, पोलीस हवालदार संदीप सपकाळ, संतोष कुंभार, शिपाई गणेश साळुंके, सुनील कदम, मयूर निंबाळकर हे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पेट्रोलिंग करीत होते.
दरम्यानच्या काळात अनेक नागरिक मास्क न लावता फिरताना आढळून आले. तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने मुळशी तालुक्यात पर्यटनास व विना मास्क फिरण्यास बंदी असताना पुणे शहरातून पर्यटनास आलेल्या 39 जणांवर पौड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मुळशी तालुक्यातील नागरिकानी मास्कचा वापर करावा. तसेच पर्यटकांना पर्यटनास बंदी असल्याने नागरिकांनी फिरू नये, असे आवाहन पौड पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.