काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी;एकदिवसीय धरणे आंदोलन…
राजगुरूनगर (प्रतिनिधी) : राजगुरूनगर नगर परिषदेच्या सात कर्मचाऱयांनी सुमारे 71 लाख रुपयांचा अपहार केला आहे असे असताना नगर परिषदेकडून त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नसल्याने आज दि 30 रोजी खेड तालुका काँग्रेस कमिटी, राष्ट्रवादी काँग्रेस व भीमशक्ती संघटनेच्या माध्यमातून धरणे आंदोलन करण्यात आले. तर काही नगरसेवक व नागरिकांनी नगरपरिषदेच्या दारात काळे झेंडे दाखवून अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
राजगुरूनगर नगर परिषदेत मार्च 2018 ते मार्च 2019 या काळात नगरपरिषदेच्या सात कर्मचाऱयांनी तब्बल 71 लाख रुपयांचा अपहार केला.ही बाब अंतर्गत लेखा परीक्षणात उघड झाली. दीड महिना उलटूनही अधिका-याकडून कारवाई करण्यात आली नाही.अपहार झाल्याचे स्पष्ट होऊनही कारवाई होत नसल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी, भीमशक्ती व शहरातील नागरिकानी संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1227664507573252/
यात चार नगर सेवकांनी मुंबई येथे नगरपालिका संचनालय, आयुक्त जिल्हाधिकारी यांच्याकडे दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली मात्र उद्यापर्यंत कारवाई न झाल्याने आज खेड तालुका काँग्रेस अध्यक्ष विजय डोळस, रेवण थिगळे, भीमशक्ती संघटनेचे तालुका अध्यक्ष अनिल जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे कैलास सांडभोर, वैभव घुमटकर, सुभाष होले यांनी खेड पंचायत समितीसमोरील महात्मा फुले पुतळ्याजवळ धरणे आंदोलन केले.
अपहारातील दोषींवर गुन्हा दाखल करावा. त्यांच्याकडून अपहार केलेले पैसे वसूल करावेत अशी मागणी केली. तर नगरपरिषदेच्या गेट बाहेर नुकताच पंचवार्षिक कालावधी संपुष्टात आलेले नगरसेवक शंकर राक्षे, सचिन मधवे, राहुल आढारी अमोल सांडभोर आदींनी काळे झेंडे दाखवून परिषदेच्या अधिकाऱ्यां विरोधात जोरदार घोषणा बाजी केली.