‘साहो’ चित्रपटाचे ऍक्‍शन पॅक पोस्टर रिलीज

अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्या ऍक्‍शन पॅक ‘साहो’ चित्रपटाचं नवीन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. ऍक्‍शन लव्हर्स प्रेक्षकांना साहो चित्रपट नक्की आवडेल, असा मालमसाला यामध्ये ठासून भरलेला आहे. त्यामुळे चित्रपटाच्या टिझरला देखील भरपूर लाईक मिळायला लागले आहेत. चित्रपटाच्या दमदार टिझर मुळे फॅन्स देखील भलतेच एक्‍साईट झाले आहेत.

‘साहो’मध्ये अभिनेता प्रभास एका गुप्तहेराच्या भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट तेलगू, तामिळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये (30 ऑगस्टला) प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)