खंडाळ्याला कोणीही वंचित ठेवू शकणार नाही

खा. उदयनराजे भोसले यांचे प्रतिपादन
11860 हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येणार

सातारा – भोर तालुक्‍यातील निरा देवघर धरणाचा उजवा कालवा एकूण 158 किलोमीटरचा आहे. यापैकी कि.मी. 26 ते कि. मी. 78 या एकूण 52 किलोमीटरचा कालवा खंडाळा तालुक्‍यातून जात आहे. खंडाळा तालुक्‍यासाठी वापरण्यात येणार पाण्याकरीता, मुख्य कालव्यावर चार मुख्य वितरीका आणि शाखा कालव्यांवर सहा मुख्य वितरीकाव्दारे आणि तीन शासकीय उपसा सिंचन योजनाद्वारे खंडाळा तालुक्‍यातील 11860 हेक्‍टर क्षेत्र ओलीताखाली आणण्यात येणार आहे. यामध्ये कोणी काहीही बदल करु शकणार नाही, खंडाळा तालुक्‍याला निरा देवघर उजव्या कालव्याच्या पाण्यापासून कोणीही वंचित ठेवू शकणार नाही, अशी ठोस माहिती सातारा लोकसभा मतदार संघाचे खा. उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

काल लोणंद येथे भेट दिल्यावर निरा देवघर व्यवस्थापनाशी आम्ही जरुर ती चर्चा केली आहे. धरण व्यवस्थापनाला आणि आम्हाला समजेल अशा पध्दतीने आम्ही सद्यस्थितीची माहिती घेतली आहे असे नमूद करून, खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात पुढे नमूद केले आहे की, निरा देवघर या मातीच्या धरणाची एकूण प्रकल्प किंमत सुमारे 3167 कोटी इतकी आहे. पैकी सुमारे 767 कोटी रुपयांची कामे झाली असून, निरा देवघर उजव्या कालव्यामधून भोर तालुक्‍यासह सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण तालुक्‍यांना आणि सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्‍यांमधील एकूण 43050 हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. निरा देवघर धरणाचे काम सन 2008 साली पूर्ण
झाले असून, आज रोजी पूर्ण क्षमतेने पाणी अडवण्यात आलेले आहे.

निरा देवघर उजवा कालवा पहिल्यांदा 198 कि.मी.चा होता, तथापि आता तो 158 कि.मी.चा होणार आहे, पैकी भोर तालुक्‍यातील कि. मी. 1 ते 25 अखेर तसेच खंडाळा तालुक्‍यातील कि.मी.26 ते 65 अखेर कालव्याचे काम पारंपारिक उघड्या पध्दतीने पूर्ण करण्यात आले आहे. अस्तरीकरणाचे काम सुरु आहे. खंडाळा तालुक्‍यातून जाणारा 65 कि.मी.च्या पुढील भागाचे काम बंदिस्त नलिकाद्वारे करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)