जिल्ह्यात अवैध वाळू उपशावर कारवाई  

1 कोटी 3 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त

नगर –
नेवासा, पारनेर व बेलवंडी पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत दोन जेसीबी, 1 ट्रॅक्‍टर, 2 ट्रक, डंपर अशी एकूण 5 वाहने जप्ते करून पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत 1 कोटी 3 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नेवासा पोलीस ठाणे हद्दीत गोरख नामदेव धनवडे (वय-29, रा.गंगापूर ता.नेवासा), रवींद्र रमेश जाधव (वय-28, रा. चिंचवण, ता.नेवासा) यांच्यावर गुन्हे दाखल केले. विना नंबरचे 1 जेसीबी व एक डंपर (एमएच 20, सी. टी 4708) असा 60 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पारनेर पोलीस ठाणे हद्दीत मारुती सोनाजी तोडकर (वय-20, रा. देवठाणा ता.पुसत जि. येवतमाळ), अज्ञात ट्रॅक्‍टर मालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

तसेच बेलवंडी पोलीस ठाणे हद्दीत एक अज्ञात आरोपी एल.पी. ट्रक (एम.एच 12 एफ.झेड 6483) व त्यामध्ये 4 ब्रास वाळू असा 8 लाख 40 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला, एकूण 1 कोटी 3 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल तीन ठिकाणाहून जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने विजयकुमार वेठेकर, दत्ता गव्हाणे, रवींद्र कर्डिले, सचिन आडबल, प्रकाश वाघ, रणजित जाधव, राहीत मिसाळ, मच्छिंद्र बर्डे, शिवाजी ढाकणे यांनी सापळा रचवून कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.