पिंपरी : चौदा अनधिकृत बांधकामांवर कारवाई

पिंपरी – महानगरपालिका बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग “ग’ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत बुधवारी 14 वाढीव व नव्याने बांधलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. एकूण 14 हजार चौरस फुट इतके क्षेत्र मोकळे करण्यात आले.

आर.सी.सी., वीट बांधकाम आदींचा त्यामध्ये समावेश होता. 2 जेसीबी, 1 डंपर, 4 ब्रेकरच्या मदतीने ही कारवाई पूर्ण केली. 1 उपअभियंता, 1 कनिष्ठ अभियंता यांच्यासह 7 बीट ऑफिसर, 10 महापालिका कर्मचारी यांच्या पथकाने ही कारवाई पूर्ण केली.

Leave A Reply

Your email address will not be published.