विद्यार्थी वाहतुकीच्या 44 वाहनांवर कारवाई

आरटीओ आणि वाहतूक विभागाची मोहीम
पुणे  – प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि वाहतूक विभागाकडून दि. 11 ते 16 नोव्हेंबर या कालावधीत सुमारे 44 शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली.

नियमांचे पालन न करणाऱ्या स्कूल बस आणि व्हॅनचालकांवर कारवाई करण्यासाठी आरटीओ आणि वाहतूक विभागाकडून विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. दि. 11 ते 16 नोव्हेंबर या कालावधीत ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती सहायक परिवहन अधिकारी अश्‍विनी स्वामी यांनी दिली. शहरामध्ये विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या वाहनांची संख्या हजारोंच्या घरात आहे. मात्र, शालेय परिवहन समितीने नेमून दिलेल्या नियमांचे पालन न करता विद्यार्थ्यांची बेकायदेशीर आणि अवैध पद्धतीने होणाऱ्या वाहतुकीला आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. या विशेष पथकांकडून होणाऱ्या कारवाईमध्ये वाहनचालकांना नोटीस देण्यात येत असून वाहनाचे कागदपत्रे ताब्यात घेत आहेत.

पालकांनी जागरूक असणे आवश्‍यक
आपला पाल्य ज्या बस/ व्हॅनने जातो, त्या वाहनाची कागदपत्रे पूर्ण असल्याची खात्री करावी.
शालेय विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने सुरक्षित असल्याची पाहणी करावी.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नेमून दिलेल्या नियमांनुसार वाहनाची रचना असल्याची खात्री करावी.

Leave A Reply

Your email address will not be published.