पिरंगुटमध्ये 26 वाहनांवर कारवाई

सात हजारांचा दंड वसूल : रोडरोमिओंना दिली समज

पिरंगुट- येथील शाळा परिसरात विना परवाना वाहन चालविणाऱ्या दुचाकी व चारचाकी तसेच काळ्या काचा असलेल्या चारचाकी अशा एकूण 26 वाहनांवर पौड पोलिसांच्या वतीने कारवाई करण्यात आली. यामध्ये सात हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्याचबरोबर परिसरात फिरणाऱ्या रोडरोमिओंवर कारवाई करण्यात आली.

पौडचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मयूर निंबाळकर, सुहास सातपुते, रॉकी देवकाते, प्रशांत शिंदे, तेजस मरकड, संजय जावीर यांच्या पथकाने ही कारवाई केली. यामध्ये विनापरवाना वाहन चालवणे, जोरात गाडी पळवणे, विनाकारण शालेय आवारात फिरणे, चारचाकी वाहनाला फिल्मिंग असणे अशा दुचाकी व चारचाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली. याविषयी पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी सांगितले की, शाळा व महाविद्यालय परिसरात विनापरवाना वाहन चालविणा-यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच काळ्या काचा असलेल्या चारचाकी वाहनचालकांवर ही कारवाई झाली आहे. रोडरोमिओंना तात्पुरती समज देऊन सोडण्यात आले आहे. आगामी काळात तालुक्‍यात विविध ठिकाणी कारवाई होणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)