स्कूल बसवरील कारवाई शिथील करण्याची मागणी
उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने स्कूल व्हॅन वर कारवाई करण्यात येत आहे. कागदपत्रे बरोबर असली तरी कारवाईला समोर जावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांची ही गैरसोय होते असून आम्हाला ही आर्थीक नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे स्कूल बसवरील कारवाई काहीदिवस शिथिल करावी. व नविन नियमाचे वाहनचालकांना प्रशिक्षण द्यावे अशी मागणी स्कूल व्हॅन चालकांनी केली आहे.
नगर – शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात उपप्रादेशिक परिवण विभागाने कारवाईचा धडाका धरला आहे. गेल्या दोन तीन दिवसात 254 वहनांची तपासण्यात करण्यात आली. त्यातील 127 वाहने अवैध वाहतूक करणारी आढळली असून, त्यांना 1 लाख 29 हजारांचा दंड करण्यात आला आहे. ही कारवाई अशीच सुरु राहणार आल्याचे उपप्रादेशिक परिवहन विभागाचे दीपक पाटील यांनी सांगितले.
रिक्षांमधून होणारी शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षिततेबाबत मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या निर्णयानुसार उच्च न्यायालयाने परिवहन आयुक्तांना रिक्षांवर कारवाई करण्याबाबतचा आदेश जारी केला होता. त्यानुसार राज्य परिवहन कार्यालयाकडून सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आदेशाप्रमाणे शहरामध्ये कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले.
शहरात मोठ्या प्रमाणात शाळा, महाविद्यालये असल्याने रिक्षा, स्कूलबस मधून प्रमाणापेक्षा जास्त विद्यार्थ्यींची वहतूक केली जाते. याबाबत परिवहण विभागाच्या वतीने गेल्या सात दिवसात 254 स्कूल व्हॅनची तपासणी करण्यात आली. त्यातील 127 वाहने अवैध वाहतुक करणारी वाहने आढळली. त्यातील 97 स्कूल बस. 29 रिक्षांवर कारवाई केली. त्यातील 16 वाहने जप्त केली असून त्यांना 1 लाख 29 हजार 900 रुपयांचा दंड करण्यात आला आहे.