उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; दोघांना अटक

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील तमनाकावाडा येथे गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची विक्री करणार्‍या अड्डयावर छापा टाकून सव्वा लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर भरारी पथकानं ही कारवाई केली

कागल तालुक्यातील तमनाकावाडा येथे एका छपरात गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची विक्री होत सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्काच्या कोल्हापूर भरारी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर त्याठिकाणी छापा टाकण्यात आला. या छाप्यात मद्यानं भरलेल्या बाटल्या आढळून आल्या. याप्रकरणी उमाजी रावसाहेब पाटील आणि सोहन मनोहर तिप्पे यांना अटक केली असून त्यांच्याकडून सव्वा लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई निरीक्षक संभाजी बरगे, दुय्यम निरीक्षक जगन्नाथ पाटील, किशोर नडे यांच्या पथकानं केली. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सीमा, राष्ट्रीय महामार्गावर गस्त वाढवून अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कारवाई केली जाणार असल्याचं निरीक्षक संभाजी बरगे यांनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.