मोकाट फिरणाऱ्यांवर सासवडमध्ये कारवाई

सासवड  – सासवड पोलीस स्टेशनकडून करोना नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांवर, हॉटेल, उपहारगृह तसेच मोटर वाहन कायदा न पाळणाऱ्या आणि निर्बंधाचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात आली. (दि 4) विनामास्क फिरणाऱ्या 28 नागरिकांवर रुपये 14 हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली.

हॉटेल, उपहारगृहात निर्बंधाचे पालन न करणाऱ्या 4 व्यावसायिकांवर 4 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. मोटर वाहन कायदा कारवाईअंतर्गत दहा मोटरसायकलस्वारांवर 2400 रुपये वसुली केली. निर्बंधांचे पालन केले नाही म्हणून 1 आयपीसी 188 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस स्टेशनकडून बसवण्यात आले आहे सोमवारपासून सासवड शहरात कडक कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक राहुल घुगे, एच. सी. माने, पी. एन. तारु, पी. सी. जाधव, होमगार्डकडून केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.