ओतूर (प्रतिनिधी)- पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये गस्त करीत असताना पो काॅ. किरण कुसाळकर यांना मिळालेल्या माहितीवरून पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने सापळा लावून दरोडा, हत्येसाठी अपहरण, खुनाचा प्रयत्न यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेले सचिन सखाराम मेंटागळे व निवृत्ती तबाजी कुटे या आरोपींना ओतूर हद्दीतून ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी ओतूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कार्यवाही संदीप पाटील पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, विवेक पाटील अपर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, पद्माकर घनवट पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, राजू पवार, किरण कुसाळकर, मोसिन शेख, महेंद्र कोरवी व विशाल बोरुडे या पथकाने केली आहे.