राम जन्म भूमी प्रकरणाचा शनिवारी निकाल

विद्वेषी पोस्ट फॉरवर्ड केल्यासही कारवाई; कडेकोट बंदोबस्त

रामजन्मभूमी निकालाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांचा इशारा;

सरन्यायधिशांनी घेतली पोलिस महासंचालक, मुख्य सचिवांची भेट

नवी दिल्ली : रामजन्मभूमी बाबरी मस्जीद प्रकरणाचा निकाल शनिवारी (दि.९) सकाळी १०:३० वाजता जाहीर करण्यात येईल, असे वृत्त एनआयए या वृत्त संस्थेने दिले आहे. या पार्श्‍वभूमीवर समाज माध्यमांतील पोस्टवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. या प्रकरणात खातरजमा न करता विद्वेष पसरवणाऱ्या पोस्ट फॉरवर्ड करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशा इशारा दिल्ली पोलिसांनी दिला आहे.

अयोध्येत अनेक स्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तेथे ड्रोनद्वारे टेहळणी करण्यात येत आहे. मुख्य न्यायधिश रंजन गोगोई यांनी शुक्रवारी दुपारी उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव राजेंद्र कुमारी तिवारी आणि पोलिस महासंचालक ओमप्रकाश िंसंग यांची भेट घेतली. केंद्रीय गृहमंत्रालयानेही सर्व राज्यांना सतर्कता राखण्याचे आदेश दिले आहेत. त्याच बरोबर केंद्राने केंद्रीय राखीव पोलिस दलाचे चार हजार जवान उत्तर प्रदेशात तैनात केले आहेत.

या मुद्यावर कोणतेही भाष्य करू नये असा सज्जड दम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या मंत्र्यांना दिले आहेत. न्यायलयाच्या निर्णयाचा आदर करा आणि कोणत्याही स्थितीत शांतता पाळा, असे आवाहन दोन्ही धर्मीयांच्या नेत्यांनी केले आहे.

काही प्रमुख उपाय योजना
* केंद्र सरकारचे सर्व राज्य सरकारना अती सतर्कतेचे आदेश. संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवण्याचे आदेश.
* केंद्रीय गृहमंत्रालयाकडून उत्तर प्रदेशात विशेषत: आयोध्येत चार हजार निमलष्करी दलाचे जवान तैनात.
* उत्तर प्रदेशच्या आंबेडकर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयात आठ तात्पुरते कारागृह उभारले.
* दहशतवाद प्रतिबंधात्मक पथक (एटीएस), राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए), आणि स्थानिक अन्वेषण विभागाचे अधिकारी आयोध्येत तळ ठोकून.
* उत्तर प्रदेशमध्ये सर्व 75 जिल्ह्यातील पोलिसांसह सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या रजा 30 नोव्हेंबर पर्यंत रद्द.
* समाजमाध्यमांवर तपास यंत्रणांचे बारीक लक्ष. विद्वेष पसरवणारे संदेश आढळल्यास राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार कारवाई.
* महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून आक्षेपार्ह संदेशावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथकाची स्थापना.
* मिरतमध्ये शुक्रवारच्या नमाजनंतर निकाल काहीही लागला तरी शांतता बाळगण्याचे आवाहन करण्यासाठी इमामांची भेट
* सर्वोच्च न्यायलयाच्या या खडपीठाचे सदस्य असणारे न्यायाधिश अशोक भूषण यांच्या अशोक नगर येथील निवासस्थानाबाहेरील बंदोबस्तात वाढ.
* राम जन्मभूमी न्यासाने दगड वाहून नेण्याची कार्यशाळा थांबवली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)