एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध
नगर – महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात हे 18 जुलै रोजी मुंबई येथे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यास पदभार स्वीकारणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायकराव देशमुख यांनी दिली.
मंगळवार रोजी दुपारी 1 वाजता मुंबई येथील मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात मावळते अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार आहे. यावेळी आ. थोरात, नितीन राऊत, आ. बसवराज पाटील, आ. विश्वजीत कदम, आ. यशोमती ठाकुर, व मुजफ्फर हुसेन हे कार्याध्यक्षपदाचा पदभार स्विकारणार आहेत. या पदग्रहण समारंभानंतर राज्यातील कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीस अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लीकार्जून खरगे व राज्यातील सर्व ज्येष्ठ मंडळी उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहे. या बैठकीसाठी राज्यातील जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, प्रदेश प्रतिनिधी, आदींना निमंत्रित करण्यात आले आहे.
आ. थोरात प्रदेशाध्यक्षपदाचा गुरुवारी स्वीकारणार पदभारनगर, दि.16 (प्रतिनिधी) -पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील वाळूतस्कर अवैध व्यावसायिकांसह रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगरसेवक समद वाहब खान (वय 47 वर्षे रा.मुकुंदनगर) व शेहबाज उर्फ बाबा जाफर खान (वय 32 वर्षे रा.सदर) यांना ताब्यात घेवून नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द केले आहे.
पोलीस अधीक्षक इशु सिंधू यांनी जिल्हातील वाळू तस्करांसह अवैध व्यावसायिक तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत देत. अशा गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेवून समद वाहब खान व शेहबाज उर्फ बाबा जाफर खान (अंडा)या दोघांवर एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करण्याच्या प्रस्तावास मंजुरी देवून या दोघांना स्थानबध्द करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आता हे दोघेजन 15 जून पासून 1 वर्षाच्या कालावधीसाठी नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे. या दोघांवर कॅम्प पोलीस ठाणे, कोतवाली पोलीस ठाणे, तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमांअंतर्गत एकूण 8 गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक इशु सिंधु यांचे मार्गदर्शन व सुचना तसेच अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक फौजदार मधुकर शिंदे, किरण जाधव, सूरज वाबळे, तसेच भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजपूत व महिला पोलीस कर्मचारी वैशाली गायकवाड यांनी ही कारवाई केली. तसेच आगामी काळात वाळूमाफीया, हातभट्टी दारू, अवैध व्यावसायिक, झोपडपट्टी दादा यांच्या विरूध्द मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करणार असल्याचे संकेत पोलीस अधीक्षक इशु सिंधु यांनी दिले आहेत.