बारामती- मेडद येथील हातभट्टी दारुच्या दोन अड्ड्यांवर बारामती तालुका पोलिसांनी कारवाई करीत असुमारे 39 हजार रुपयांचे कच्चे रसायन नष्ट करण्यात आले, तर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी दिली. काळू महिपती बगाडे व संतोष मधुकर बागाव असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.
याबबतची माहिती अशी की, बारामती शहरानजीक असलेल्या मेडद येथे मोठ्या प्रमाणावर हातभट्टी दारु बनवली जाते, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार संबंधित ठिकाणी पोलिसांनी धाड टाकात दारू अड्ड्यांवर कारवाई केली.