विनामास्क फिरणाऱ्यांवर शिराळामध्ये कारवाई

शिराळा (प्रतिनिधी) – शिराळा तालुक्यातील करोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर नगराध्यक्षा अर्चना शेटे व मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. यानुसार मागील चार दिवसात सात हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

तालुक्याची करोनाबाधितांची संख्या 140 वर पोहचली होती. दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढत असून खबरदारीचा उपाय म्हणून शिराळा शहरात मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. तर विनामास्क फिरणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाईचे आदेश दिले आहे.

विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू असून हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे, असे अर्चना शेटे यांनी सांगितले. उपनगराध्यक्षा कीर्ती पाटील म्हणाल्या कि, शहर अनेक वेळा निर्जंतुकीकरण केले आहे. पुन्हा फवारणी करून शहर निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून काही कठोर निर्णय घेण्यात आल्याचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी सांगितले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.