डिंभे – आमोंडी (ता. आंबेगाव) गावाच्या हद्दीत गावठी दारू विकणाऱ्या शंकर गोतारणे (वय 22, रा. शिंदेवाडी) याचेवर कायदेशीर कारवाई करण्यात आली, असल्याची माहिती घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिली.
आमोंडी गावाच्या हद्दीत इनामवस्ती येथील घोडनदीच्या कडेला खडकडोह येथे एक इसम बिगर परवाना बेकायदा दारू विकत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अपर्णा जाधव यांना पेट्रोलिंग करताना मिळाली. त्यांनी त्वरीत संबंधित ठिकाणी पंचासमक्ष जाऊन शंकर शिवाजी गोतारणे हा ओळखीच्या लोकांना दारू विकताना आढळला. पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी त्यास पकडून त्याच्यावर गुन्हा दाखल केला. याबाबतची तक्रार पोलीस हवालदार दिलीप वाघोले यांनी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अपर्णा जाधव करीत आहेत.