मुंबईत बसून परदेशी नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दोन कॉल सेंटरवर कारवाई

मुंबई – मुंबई पोलिसांनी दोन बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे. मुंबई क्राईम ब्रॉंचने मालाड येथे छापे टाकून ही कारवाई केली आहे. या कारवाईत दोन जणांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही बनावट कॉल सेंटरमध्ये व्हीओआयपी कॉलद्वारे परदेशी नागरिकांची फसवणूक केली जात होती.

हे दोन्ही बनावट कॉल सेंटर 70 ट्रेड.कॉम आणि मेक बिझनेस सोल्यूशन या नावाने चालवले जात होते. या दोन्ही कंपन्यांकडून नफा देण्याच्या नावाखाली परदेशी नागरिकांची फसवणूक केली जात होती. फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर परदेशी नागरिक कॉल करून या कंपन्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. मात्र, व्हीओआयपी कॉल असल्याने परदेशी नागरिकांचा संपर्क कंपनी सोबत होत नाही.

या दोन्ही बनावट कॉल सेंटरमध्ये एकूण 75 हून अधिक लोकं काम करत होते. याबाबत माहिती मिळताच, मुंबईच्या क्राईम ब्रॉंचने दोन्ही कॉल सेंटरवर छापा टाकून आदित्य माहेश्‍वरी, गिरिराज दमानी या दोघांना अटक केली.

अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून दोन सर्व्हर, हार्ड डिस्क जप्त केलेत. तसेच प्रत्येक कॉम्प्युटरचे स्क्रीन शॉट्‌स घेतले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.