शिरूर -शिरूर शहरात (दि.22) पासून दुकाने सुरू होणार आहेत. या कालावधीत नागरिकांनी अटी व शर्तीचे पालन करणे गरजेचे आहे. अति शर्तीचे पालन न करणारे दुकान बंद करण्यात येणार असल्याचा इशारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी माहिती रोकडे यांनी दिला आहे.
शहरात ज्येष्ठ नागरिक 65 वर्षावरील व 10 वर्षाखालील मुले, गरोदर स्त्रिया यांना घराबाहेर पडण्यास मनाई आहे. अशा व्यक्ती आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
व्यापाऱ्यांनी दुकानात व परिसरामध्ये दररोज निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सचे पालन करावे. दुकानातील कामगारांमध्ये व ग्राहकांमध्ये सहा फुटांचे सुरक्षित अंतर नेहमी राहिल, यासाठी उपाययोजना आवश्यक आहे.
कामगार व ग्राहकांसाठी दुकानाबाहेर हॅन्ड सॅनिटायझरची सोय बंधनकारक केली आहे. दुकानात एकाचवेळी पाचपेक्षा जास्त ग्राहक असणार नाहीत, याची काळजी घेण्याची जबाबदारी व्यापाऱ्यांवर आहे.