वाघोली- संचारबंदी असतानाही अवैध दारू विक्री करणाऱ्या तीन ठिकाणी लोणीकंद पोलिसांनी छापा टाकून पाच जणांवर गुन्हा करण्यात आला आहे. वाघोली परिसरामध्ये आव्हाळवाडी रोड येथील वाईन शॉप्सच्या पुढील बाजूस, गोरे वस्ती येथील गायरान परिसरात दारू विक्री करणाऱ्या तिघांवर तर मांजरी खुर्द गावच्या हद्दीत आव्हाळवाडी रोडच्या जेधे बंगल्याजवळ दोघांवर कारवाई करून अटक करण्यात आली आहे.