तरबेज अन्सारीच्या हत्येवर टिकटॉक व्हिडीओ; पाच तरुणांवर कारवाई

मुंबई – झारखंडमधील खरसावन जिल्ह्यात तरबेज अन्सारी या 24 वर्षीय तरुणाला जमावाकडून मारहाण करण्यात आली. या मारहाणीत तरबेज अन्सारी तरुणाचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच मुंबईमध्ये टिकटॉक या ऍपद्वारे तरबेज अन्सारीच्या हत्येचा उल्लेख करत एक व्हिडिओ बनविण्यात आला आहे. या व्हिडिओत तरुण ‘जर उद्या त्याच्या मुलाने बदला घेतला तर प्रत्येक मुसलमान दहशतवादी असतो असं म्हणून नका.’ अस वादग्रस्त विधान व्हिडिओमध्ये केले आहे. या व्हिडिओ टीम ७ या युजर्सने अपलोड केला. यानंतर हा व्हिडिओ काहीच क्षणात वायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या व्हिडिओची काही लोकांनी दखल घेत याविरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. दरम्यान मुंबई पोलिसांनी या व्हिडिओचा तपास करत मुंबईतील 5 जणांवर कारवाई केली आहे. तसेच त्यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तसेच या युजर्सचे ‘टिकटॉक’ अकाउंट बंद करण्यात आलं आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.