सुरक्षेबाबत दिरंगाई करणाऱ्या 5271 वाहनचालकांवर कारवाई

सीटबेल्ट न लावणाऱ्या 3358 आणि हेल्मेट न घालणाऱ्या 1913 जणांकडून दंड वसूल
पिंपरी : वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी तसेच रस्त्यावरील अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. गेल्या 51 दिवसांमध्ये चारचाकी वाहन चालविताना सीटबेल्ट न लावणाऱ्या तीन हजार 358 जणांवर कारवाई केली. तर दुचाकी चालविताना हेल्मेट न वापरणाऱ्या एक हजार 913 चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

चारचाकी मोटारीतील प्रवाशांनी सीटबेल्ट न वापरल्यामुळे व दुचाकीच्या अपघातामध्ये हेल्मेट न वापरल्यामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यास सुरवात केली आहे. 1 जानेवारी ते 20 फेब्रुवारी या 51 दिवसांच्या कालावधीत वाहतूक पोलिसांनी सीटबेल्ट न लावणाऱ्या तीन हजार 358 वाहन चालकांवर कारवाई करत या चालकांकडून सहा लाख 71 हजार 600 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

हेल्मेट चालकांवर थेट कारवाई न करता त्यांनी एखाद्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्या दंडासह हेल्मेट न घातले असल्यास त्याचाही दंड ठोठविण्यात आला. अशाप्रकारे गेल्या 51 दिवसात दुचाकीस्वारांकडून नऊ लाख 56 हजार 500 रुपयांचा दंड वूसल केल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.