नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 150 जणांवर कारवाई

भोर  -वीकेंड लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 150 जणांवर भोर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. यामध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांकडून 75 हजारांचा दंड वसूल केला आहे, अशी माहिती पोलीस उपनिरिक्षक राजेंद्र पवार व बळीराम सांगळे यांनी दिली.

भोर परिसरात पर्यटन स्थळे, गड किल्ल्यावर प्रशासनाने पर्यटनास बंदी घातली आहे. तरीही पर्यटक नियमांचे उल्लंघन करून मनमानी करीत आहेत. त्यामुळे भोर पोलिसांनी भोर शहर, बाजारपेठ, महाड नाका, रायरेश्‍वर, विचित्र गड

आणि वरंधा घाट येथे विशेष मोहिम राबवून विना मास्क, विनाकारण भटकणारे, तसेच गड किल्यांवर पर्यटनासाठी आलेल्या विनापरवाना पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करुन 75 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

याशिवाय भोर बाजार पेठेतील नियमांचे उल्लंघन आणि वीकेंड लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सात दुकानांवर कारवाई करण्यात आली.

यावेळी पोलीस उपनिरिक्षक राजेंद्र पवार, बळीराम सांगळे, सहायक फौजदार अशोक खुटवड, पोलीस हवालदार सुभाष गिऱ्हे, पोलीस नाईक अमोल मुऱ्हे, महिला पोलीस हवालदार प्रमिला निकम, दामिनी दाभाडे, अनिल हिप्परकर व गृहरक्षक दलाच्या जवानांनी ही कारवाई केली.

तालुक्‍यातील पर्यटनस्थळांना भेटी देण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे कोणीही पर्यटनास येवू नये व आल्यास कारवाई केली जाईल, असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांनी केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.