फ्लिपकार्टकडून क्‍लिअरट्रीपचे अधिग्रहण

नवी दिल्ली – फ्लिपकार्ट या कंपनीने आता पर्यटन क्षेत्रातील क्‍लिअरट्रीप कंपनीचे अधिग्रहण केले आहे. त्यामुळे आता पर्यटन क्षेत्रातही फ्लिपकार्ट सक्रीय होणार आहे. क्‍लिअरट्रीपमधील मधील 10 टक्के भाग भांडवल फ्लिपकार्टने घेतले आहे. प्राप्त माहितीनुसार आता क्‍लिअर टीप स्वतंत्र कंपनी म्हणून काम करेल.

मात्र तिचे नियंत्रण फ्लिपकार्डकडे असणार आहे. क्‍लिअरट्रीपच्या कुठल्याही कर्मचाऱ्याला काढले जाणार नाही. मात्र हा व्यवहार किती रकमेचा होता हे दोन्ही कंपन्यांनी स्पष्ट केलेले नाही. भारतामध्ये बरेच लोक क्‍लिअरट्रीपचा वापर पर्यटनासाठी करतात.

दरम्यान फ्लिपकार्ट समूहाने महाराष्ट्रातील पुणे व औरंगाबाद परिसरात ग्रोसरी सेवा सुरु केली असून त्यामुळे शहरातील ग्राहकांना आता घरपोच डिलिव्हरीसह दैनंदिन गरजेच्या वस्तू उपलब्ध होणार आहेत.

फ्लिपकार्ट ग्रोसरीच्या माध्यमातून दैनंदिन गरजेच्या वस्तू, धनधान्ये, स्नॅक्‍स आणि पेय, कन्फेक्‍शनरी, पर्सनल केअर यांसारख्या 200हून अधिक श्रेणींतील 7 हजारांहून अधिक उत्पादने उपलब्ध होणार आहेत. या केंद्रामुळे एक हजाराहून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या असून यामुळे स्थानिक रोजगारनिर्मिती व अर्थव्यवस्थेला बळ मिळाले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.