ACP Vishal Dhume : संभाजीनगरचा पोलीस अधिकारी (एसीपी) विशाल ढुमे याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्याच्यावर एका महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सीटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर गृह विभागानं ही कारवाई केली आहे.
मद्यधुंद अवस्थेत मित्राच्या पत्नीसोबत गैरकृत्य करत विनयभंग केल्यानं एसीपी विशाल ढुमेवर निलंबनाीच कारवाई करण्यात आली आहे. याबाबतचा एक व्हिडिओ देखील समोर आला होता, या व्हिडिओमध्ये ढुमे आपला मित्र आणि त्याच्या पत्नीसोबत प्रवास करता दिसत आहे. मागच्या सीटवर बसलेला ढुमे गैरकृत्य करत असल्याचं यात दिसत आहे. याबाबतचा व्हिडीओ एबीपी माझा या वृत्तसंकेतस्थळाने प्रकाशात आणला होता.
पीडित महिलेच्या तक्रारीवरुन या प्रकरणी औरंगाबादच्या सीटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा अहवाल गृहविभागानंही मागवला होता. या अहवालाच्या आधारेच गृहविभागाकडून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ( ACP Vishal Dhume )