एकविरा देवी मंदिराचा सोनेरी कळस शोधण्यात पोलिसांना अखेर यश

कार्ला – महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला-वेहरगाव गडावरील कुलस्वामिनी आई एकवीरा देवीच्या मंदिराच्या कळस चोरीचे प्रकरण पुणे ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणले आहे.

महाराष्ट्रातील आगरी कोळी, कुणबी समाजाची तसेच ठाकरे घराण्याची कुलदैवत असणाऱ्या कार्ला एकवीरा देवीच्या मंदिरातील कळस चोरीचे अतिशय संवेदनशील प्रकरण पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अतिशय सखोल तपास करून उघडकीस आणलेले आहे. ऑक्टोबर २०१७ मध्ये एकविरा देवीच्या मंदिरावरचा कळस चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली होती. सोन्याचा मुलामा असलेला हा कळस होता. या घटनेमुळे देवी भक्तांमध्ये संतापाची लाट पसरली होती. सुमारे एक लाख २५ हजार रूपये किंमतीचा हा कळस होता.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.