देशसेवेसाठी उमेदवार घडविणारी आचार्य अॅकॅडमी

एनडीए महाराष्ट्रात आहे, पण एनडीएत महाराष्ट्रातील लोक कमी आहेत, असा विरोधाभास आहे. कारण, यासाठीची प्रवेश प्रक्रियाच अनेकांना माहिती नसते. यावर “आचार्य ऍकेडमी’ हा एक चांगला पर्याय ठरला आहे.

“मी स्वतः डिफेन्स क्षेत्रात प्रचंड रस असलेला. माझे वडील एअर फोर्समध्ये होते त्यामुळे या क्षेत्राविषयी माहिती आणि आवड होतीच. मी एनडीएसाठी ही प्रयत्न करत होतो. त्यासाठी परीक्षा दिल्या होत्या. त्यामुळे अनेक लोक परीक्षेच्या माहितीसाठी माझ्याकडे येत होते. माझे गणित व इंग्रजीतील प्रावीण्य इथे उपयोगी आले. या परीक्षांमध्ये मॅथ्स 300, तर इंग्लिश 200 मार्काचे असते. विद्यार्थ्यांचे गणित चांगले करून घेता घेता मग संपूर्ण गायडन्स म्हणून या विषयाकडे वळालो. गेली अठरा वर्षे आम्ही आचार्य अॅकेडमीच्या माध्यमातून 100% निकाल देण्याचे उद्दिष्ट्य घेऊन वाटचाल करत आहोत.’ असे आचार्य अॅकेडमीचे संस्थापक प्रशांत भिरंगे सांगतात.

एनडीए, सीडीएसच्या प्रवेश परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना नक्की कशी आणि काय तयारी करावी, हे कळत नाही. केवळ बुद्धिमत्ता आणि आवड पुरेशी नसते. तिथे मानसिक, बौद्धिक, शारीरिक सामर्थ्याचा कस लागतो. डिफेन्समध्ये जाण्यासाठी चार पायऱ्यातून जावे लागते. written, Interview, Medical and Merit list या त्या पायऱ्या आहेत. विद्यार्थ्याच्या स्ट्रॉन्ग पॉईंटसचा अभ्यास केला जातो. आपल्यात पोटेन्शियल काय आहे, याविषयी विद्यार्थ्यांना संभ्रम असतो आणि पालकांपुढे आपण नक्की काय करावे, ही समस्या असते. अॅकॅडमीमध्ये आल्यानंतर मुलाचा कल ओळखून मग विद्यार्थ्याला त्याची पुढची वाट दाखवली जाते प्रत्येक एनडीए, सीडीएसच्या प्रवेश परीक्षांची तयारी करून घेतली जाते.

आचार्य अॅकॅडमीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक मुलाची बलस्थाने ओळखून तशा टेस्ट, कॅम्प्स, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम घेतले जातात. एनडीए प्रवेश परीक्षेला 11 वी 12वीचा अभ्यासक्रम असल्यामुळे दहावी नंतरच एनडीएची तयारी करणे फायदेशीर ठरते. 12वी नंतर आपणास जितक्‍या वेळा परीक्षा देता येते त्यापेक्षा दहावीनंतर परीक्षा दिली, तर अधिक वेळा परीक्षा देता येईल व ती परिपूर्ण तयारीने असेल.

2020 साठी व्हिजन
देशसेवा करण्यासाठी अशीच उत्साही दमदार उर्जावान पिढी घडायला हवी. अजून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आमची अॅकॅडमी पोहोचायला हवी. आमचा 100% रिझल्ट यायला पाहिजे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला पाहिजे. एक डिफेन्सचा प्लॅटफॉर्म म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचलेले असावे. आमचे जास्तीत जास्त विद्यार्थी देशसेवेत असावेत, मिलिटरी ऑफिसर म्हणून पुढे यावेत.

विद्यार्थ्याला स्वपरिचय करून दिला, की वाट सापडणे सोपे होते. या धोरणाने प्रेरित होऊन आचार्य अॅकॅडमीची सुरूवात झाली. डिफेन्स ऑफिसर्स होण्यासाठीच्या परीक्षांचे कोचिंग देणारी आमची संस्था गुणवत्तापूर्ण आहे.
– प्रशांत भिरंगे, संस्थापक, आचार्य अॅकेडमी

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.