टोकियो – भारताचा अनुभवी टेबल टेनिसपटू अचंथा शरथ कमाल यालाही पुरुष एकेरीच्या टेबल टेनिस स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे भारताचे या खेळातील आव्हानही आता संपुष्टात आले आहे.
अचंथाला चीनच्या मा लॉंगकडून 7-11,11-8,11-13,4-11,4-11 असा पराभव स्वीकारावा लागला. सोमवारी मनिका बात्रा पराभूत झाल्यामुळे भारताचे महिला एकेरीतील आव्हान संपले होते आता मंगळवारी अचंथाच्या पराभवाने पुरुष एकेरीतील आव्हानही संपले आहे.