जयपूर – राजस्थानातील कॉंग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे निकटवर्तीय आणि त्या राज्यातील एक प्रबळ मानले जाणारे मंत्री महेश जोशी यांच्या मुलावर एका महिला पत्रकाराने बलात्काराचा आरोप करणारी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे या राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
महेश जोशी यांचा मुलगा रोहित जोशी याच्यावर मारहाण करणे, ब्लॅकमेल करणे आदी आरोपही महिलेने केले आहेत. घरी येऊन आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी दिली जात होती असे तिने म्हटले आहे. आपले अश्लील फोटो आणि व्हिडिओ तयार करण्यात आले होते व ते व्हायरल करण्याची धमकी दिली जात होती. तुम्ही माझे काहीही करू शकत नाही, असे रोहित धमकावत होता असेही तक्रारीत म्हटले आहे.