पुणे : येरवडा परिसरातील तात्पूरत्या कारागृहातून पसार झालेल्या खून आणि मोक्कातील आरोपीस ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अहमदनगर येथील श्रीगोंदा येथे त्याला बेड्या ठोकल्या. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी वेषांतर केले होते.
देवगण अजिनाथ चव्हाण (25,रा.बोरावकेनगर, ता. दौंण्ड) असे आरोपीचे नाव आहे. तो गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास पहिल्या मजल्यावरील खिडकीचे गज उचकटून तीघा साथीदारांसोबत पळाला होता.
चव्हाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर दौंड व यवत पोलिस ठाण्यात खुन, दरोडा, जबरी चोरी असे 9 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्याला पुढील कारवाईसाठी येरवडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुंड, पोलिस कर्मचारी महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, गुरू गायकवाड, सुभाष राऊत, अंकुश ढवळे यांच्या पथकाने केली आहे.