सोने तस्करी प्रकरणातील आरोपी माफीचा साक्षीदार!

कोची – केरळमध्ये राजकीय सनसनाटी निर्माण करणाऱ्या सोने तस्करी प्रकरणातील एका आरोपीने माफीचा साक्षीदार बनण्याची तयारी दर्शवली आहे. संदीय नायर असे त्याचे नाव आहे.

माफीचा साक्षीदार बनण्याची तयारी दर्शवणारी याचिका नायरने येथील विशेष एनआयए न्यायालयात बुधवारी दाखल केली. त्याला मुख्य आरोपी स्वप्ना सुरेश हिच्या समवेत राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) काही दिवसांपूवी बंगळूरमध्ये अटक केली.

काही महिन्यांपूर्वी केरळमधील विमानतळावर कोट्यवधी रूपयांचे सोने जप्त करण्यात आले. तो साठा राजनैतिक स्वरूपाच्या सामग्रीत ठेवण्यात आला होता. ती राजनैतिक सामग्री केरळमधील संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) दूतावासाच्या नावे पाठवण्यात आली होती.

संबंधित सोने तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी असणारी स्वप्ना यूएई दूतावासाची माजी कर्मचारी आहे. त्यामुळे त्या प्रकरणाने केरळमध्ये मोठी राजकीय खळबळ उडाली.

त्या प्रकरणामुळे सोने तस्करीत भारत आणि यूएईमधील काही प्रभावी व्यक्तींचा समावेश असल्याचा संशय बळावला. त्यातून एनआयएकडे तपास सोपवण्यात आला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.