पुणे – खुनाचा प्रयत्न आणि आर्म ऍक्टमधील फरार आरोपीस स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले आहे. गुन्हा केल्यापासून तो फरार होता. फैजल उर्फ गट्ट्या करीम शेख ( 27 रा-गुलटेकडी खड्डा) असे अटक आरोपीचे नाव आहे.
स्वारगेट पोलिस ठाण्याचे तपास पथक हद्दीत गस्त घालत असताना पोलीस शिपाई ज्ञाना बडे व मनोज भोकरे यांना फैजल उर्फ गट्ट्या करीम शेख हा गुलटेकडी डायस्प्लॉट या ठिकाणी येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार त्यास सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. तो सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी खुनाचा प्रयत्न, मारामारी आणिआर्म ऍक्ट असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर, पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस हवालदार सचिन कदम, विजय कुंभार ,विजय खोमणे ,सचिन दळवी, वैभव शीतकाल, लखन ढावरे, अमित शिंदे, ज्ञाना बडे मनोज भोकरे ,शंकर गायकवाड, ऋषिकेश तितमे, संदीप साळवे, सोमनाथ कांबळे यांच्या पथकाने कामगिरी केली आहे.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा