नगर – ब्लॅकमेल करून जास्त पैसे मिळविण्यासाठी दाम्पत्यानेच मित्रांच्या मदतीने विवस्त्र होवून पेट्रोल टाकून मारहाणीचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपी गणेश सोपान झिरपे, अक्षय राजेंद्र कुटे, किरण श्रीधर कुटे, महिलेच्या पतीला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अत्याचाराची फिर्याद मागे घेण्यासाठी महिलेसह तिच्या पतीला विवस्त्र करून मारहाण केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात 10 जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत स्थानिक गुन्हे शाखा व तोफखाना पोलिसांनी गुन्ह्याची उकल करून पिडीतेच्या पतीनेच मित्रांच्या मदतीने मारहाणीचा व्हिडीओ तयार करून बनवा केला असल्याचे समोर आले.
त्यानुसार पोलिसांनी आरोपीस त्यांच्या मित्रांना ताब्यात घेतले. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हरुण मुलाणी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात पती-पत्नीसह तीघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडालेली आहे.