Pune | विद्यार्थीनीची छेडछाड खटल्यात शिक्षा झालेल्या आरोपीला उच्च न्यायालयात जामीन

जामीन - करोना परिस्थितीमुळे सुनावणी झाली व्हीडीओ काॅन्फरसिंगद्वारे

पुणे- शालेय विद्यार्थीनीची छेडछाड खटल्यात शिक्षा झालेल्या आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. करोनामुळे संचार बंदी सुरू असल्यामुळे व्हीडीओ काॅन्फरसिंगद्वारे या प्रकरणाची सुनावणी झाली.

येथील सत्र न्यायालयाने आरोपीला नववीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीची शाळेत-क्लासला जाताना येताना छेडछाड केल्याप्रकरणी अमोल निकम (वय 25 वर्षे रा. , येरवडा) याला 27 जानेवारी 2021 रोजी 4 वर्षं सक्तमजुरी व 7000/- दंडाची शिक्षा सुनावली. शिक्षा झाल्यापासून आरोपी येरवडा कारागृहात होता. दरम्यान आरोपीने याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अॅड प्राजक्ता मिलींद पवार व अॅड ऋषीकेश केशव करवंदे यांच्यामार्फत अपील केले. त्यानुसार न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी पंधरा हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

अॅड प्राजक्ता पवार यांनी युक्तीवाद केला की,आरोपी हा पुण्यातील सत्र न्यायालयातील खटल्याच्या सुनावणी दरम्यान जामिनावर होता. त्यावेळी त्याने कुठलेही गैरकृत्य केले नाही. सर्व अटी शर्तींचे पालन केले आहे. त्यामुळे त्याला जामीन द्यावा.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.