पुणे – एका तरुणीचे अपहरणी करुन गाडीतच तिच्यावर बलात्कार करण्यात आला. ही घटना बुधवारी दुपारी बावधान येथे घडली. याप्रकरणी एका तीस वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीनूसार तीच्या नातेवाईकाला अटक करण्यात आले आहे. सागर पंढरीनाथ राजगुरु(35,रा. कृपा निवास, तळेगाव दाभाडे) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार आरोपी हा फिर्यादी 30 वर्षीय तरुणीचा नातेवाईक लागतो. त्याने फिर्यादीला जबरदस्तीने ब्रीझा कारमध्ये बालेवाडी येथे बसवले. यानंतर जबरदस्तीने घेऊन जात असताना फिर्यादीने आईला फोन करुन माहिती दिली. याचा राग आल्याने सागरने तीचा मोबाईल घेऊन फोडून टाकला. यानंतर हाताने मारहाण करत गप्प गाडीत बस नाहीतर मारुन टाकीन अशी धमकी दिली. यानंतर बावधान येथे गाडी बाजूला घेऊन माझ्या शिवाय दुसऱ्या कोणाबरोबर लग्न करायचे नाही असे म्हणत तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.