चोरीच्या गुन्हयात 6 वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद

पुणे : भारती विद्यापीठ पोलिसांनी चोरीच्या गुन्हयात 6 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस जेरबंद केले आहे. त्याने सुमारे आठ लाख रुपयांचे सोसायटी चहाचे बॉक्‍स चोरले होते. राजु कुशलराम चौधरी(28,रा.उरळी कांचन) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिस उपनिरीक्षक भुषण कोते हे तपास पथकातील कर्मचाऱ्यांसह पेट्रोलिंग करत असताना त्यांना सहा वर्षापूर्वी कात्रज चौकात पार्क असलेल्या ट्रकमधून चहाचे बॉक्‍स चोरणारा आरोपी मार्केटयार्ड येथे आल्याची खबर मिळाली होती.

त्यानूसार त्याला मार्केटयार्ड येथे जाऊन ताब्यात घेण्यात आले. त्याने साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केला होता. या गुन्हयात एकूण पाच आरोपी होते, त्यापैकी चार आरोपींना अगोदर अटक करण्यात आली आहे. हा एकमेव आरोपी सहा वर्षापासून फरार होता. गुन्हा केल्यानंतर तो काही वर्षे राजस्थानला गेला होता.

मागील महिण्यातच तो फर्निचरचे कामकाज करण्यासाठी पुण्यात आला होता. ही कारवाई अपर पोलिस आयुक्त संजय शिंदे, पोलिस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलिस आयुक्त सर्जेराव बाबर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत कुंबर, पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, उपनिरीक्षक भूषण कोते, पोलिस कर्मचारी गणेश चिंचकर, अभिजीत जाधव, महेश मंडलीक, अभिजीत रत्नपारखी, कृष्णा बढे, कुंदन शिंदे, सचिन पवार, राहुल तांबे, सर्फराज देशमुख यांनी केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.