ठेकेदाराचा निष्काळजीपणाच कारणीभूत असल्याचा ठपका

दुर्घटनेविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे मागितली माहिती

पिंपरी – दापोडी येथे झालेल्या दुर्घटनेविषयी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पिंपरी-चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र पाठवून माहिती मागविली आहे. त्या माहितीच्या आधारावर राज्य सरकारकडे अहवाल पाठविण्यात येणार आहे. दरम्यान फुगेवाडी येथील दुर्घटनेच्या दिवशी बचाव यंत्रणाच्या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी अप्पर तहसीलदार गीता गायकवाड या देखील उपस्थित होत्या. या दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल त्यांनी निवासी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द केला असून त्या अहवालामध्ये देखील पालिकेच्या ठेकेदाराने कामाच्या ठिकाणी संरक्षक कठडे लावले नसल्याचा ठपका ठेवला आहे.

दापोडी येथे खड्ड्यात अडकलेल्या एका कर्मचाऱ्याला काढण्यासाठी गेलेल्या अग्निशमन दलाच्या जवानासह दोघांचा मृत्यू झाला. दुर्घटना झालेल्या ठिकाणी खड्डा कशासाठी खोदण्यात आला होता, खड्डा खोदण्यास महापालिकेने परवानगी दिली होती की नाही; तसेच मृतांच्या कुटुंबियांना कोणत्या स्वरूपाची मदत देण्यात येणार आहे, आदी माहिती मागविण्यात आली आहे. त्याआधारे राज्य सरकारकडे अहवाल पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दोघांच्या कुटुंबियांना गरज भासल्यास अतिरिक्त मदत देण्याबाबत राज्य सरकारकडे मागणी केली जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.

ही दुर्घटना घडल्यानंतर तहसीलदारांना घटनास्थळी पाठविण्यात आले होते. तहसीलदारांनी प्राथमिक अहवाल दिला आहे. या दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात सुरू असलेली कामे आणि त्या ठिकाणी करायच्या उपाययोजना, याबाबत तहसीलदार आणि तलाठ्यांकडे माहिती मागविण्यात आली असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

फुगेवाडी येथील दुर्घटनेच्या दिवशी बचाव यंत्रणाच्या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी अप्पर तहसीलदार गीता गायकवाड या देखील उपस्थित होत्या. या दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल त्यांनी निवासी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द केला असून त्या अहवालामध्ये देखील पालिकेच्या ठेकेदाराने कामाच्या ठिकाणी संरक्षक कठडे लावले नसल्याचा ठपका ठेवला आहे. तसेच या अहवालात फुगेवाडी दुर्घटनेच्या दिवशी संपूर्ण रात्रभर कसे मदतकार्य चालले? काय गोष्टी घडल्या याची नोंद करण्यात
आली आहे.

चौकशीला सहकार्यच – महापौर माई ढोरे
अग्निशामक दलाचे जवान हे मजुरांचा जीव वाचवण्यासाठी गेले परंतु दुदैवाने मजूर आणि जवान दोघानांही या घटनेत आपण गमाविले आहे. ही घटना दुर्दैवी असून त्याची सखोल चौकशी महापालिका प्रशासन करत आहे. शिवाय उच्च पातळीवरील शासकीय चौकशीला देखील महापालिकेचे सहकार्यच राहील, असेही महापौर माई ढोरे म्हणाल्या.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)