जिल्ह्यात मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त

नगर  – मतदान प्रक्रीया शांततेत पार पाडण्यासाठी जिल्ह्यात 12 विधानसभा मतदार संघात 3 हजार 722 मतदान केंद्र उभारण्यात आले होते. कर्जत-जामखेड वगळता इतर मतदान केंद्रात शांततेत मतदान झाले. प्रत्येक मतदान केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्ह्यात पोलीस प्रशासनाकडून सात हजार पोलीसांचा बंदोबस्त होता. प्रत्येक विधानसभा मतदार संघात शांततेत मतदान प्रक्रीया पारपडावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून सीमा सुरक्षा दल, रेल्वे सुरक्षा दल, एसआरपीएफ होमगार्ड असा एकून सात हजार 72 जणांचा फौज फाटा तैनात करण्यात आला होता.

राज्यात विधानसभा निवडणूकीचे मतदान सर्वत्र 21 ऑक्‍टोबर ला एकाच दिवशी पार पडत असल्याने प्रत्येक जिल्हात बंदोबस्तासाठी मोठा फौजफाटा लागणार असल्याचे नियोजन पोलीस प्रशासनाने केले होते. अशा परिस्थितीत दुसऱ्या जिल्हातून पोलीस बंदोबस्त मिळणार नसल्याने जिल्हासह, केंद्रीय सशस्त्र दल व होमगार्डवर निवडणूक बंदोबस्ताची जबाबदारी असणार आहे. जिल्हाचा विस्तार मोठा असल्याने जिल्ह्यात अनेक मतदार संघात काही संवेदनशील मतदान केंद्रावर जास्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

तालुके व तेथील महत्वाची गावे याठिकाणचा पूर्व इतिहास तपासत पोलीसांनी 40 संवेदनशील ठिकाणे निश्‍चित केली होती. तेथे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा वावर तसेच राजकियदृष्ट्‌या संवेदनशील घटना घडलेल्या आहेत तेथे वारंवार कोम्बिंग ऑपरेशन राबिवले होते. शहरात पोलीस उपअधीक्षक 1, पोलीस अधीकारी-13, पोलीस कर्मचारी-210, होमगार्ड-217, सीमा सुरक्षादलाची एक तुकडी, पेट्रोलींगच्या 10 पथके तैनात करण्यात आल्या होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.