पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांचा इशारा
लोणी काळभोर- येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गावांतील परवानाधारक शस्र वापरणाऱ्यांपैकी 183 जणांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्र पोलीस ठाण्यात जमा केली आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित परवानाधारकांनी तातडीने आपापली शस्रे पोलीस ठाण्यात जमा करावीत; अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिला आहे. हवेली तालुक्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 213 परवानाधारक शस्त्रे आहेत. त्यात 99 पिस्तूल व 114 बंदुक परवानाधारक आहेत. त्यापैकी 183 परवाना धारक शस्त्र धारकांनी आपापली शस्त्रे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जमा केलेली आहेत. अजूनही 30 परवानाधारक शस्त्रधारकांनी आपापली शस्त्रे पोलीस ठाण्यात जमा केलेली नाहीत.
अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित परवानाधारकांनी आपापली शस्त्रे तातडीने पोलीस ठाण्यात जमा करावीत; अन्यथा त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस निरीक्षक बंडगर यांनी दिला आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच निवडणुक निर्भय वातावरणात पार पडावी म्हणून निवडणुक आयोगाची आचारसंहिता लागू झाल्या पासून शस्रे पोलीस ठाण्यात जमा करणे आवश्यक आहे. आचारसंहिता लागू झाल्या नंतरच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्व परवाना धारक शस्रे पोलीस ठाण्यात जमा करावी लागतात.