‘’हिंदू कोड बिलनुसार धनंजय मुंडे चूकच, राजीनाम्यासाठी एवढं पुरेसं’’

कोल्हापूर – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांनंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करून मुंडे यांच्यावर टीका केली होती. आता चंद्रकांत पाटील पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंडेंचा राजीनामा घ्यावा असं म्हटले आहे. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते.

राज्याच्या राजकरणात कॅबिनेट मंत्र्यांचे एका महिलेसोबत संबंध होते, हे पहिल्यांदाच समोर आले आहे. रेणू शर्मा यांनी बलात्काराचे आरोप केलेले आहे. त्याची शहानिशा होईल. मात्र मुंडे यांनी स्वत:च मान्य केल की, करुणा शर्मा यांच्यासोबत आपले १५ वर्षांपासून शारिरीक संबंध होते. मला दोन मुलं असून त्यांना आपले आडनाव दिल्याचे म्हटले आहे. ही इटसेल्फ घटना मुंडे यांनी राजीनामा देण्यासाठी पुरेसी असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान हिंदू कोडप्रमाणे आपला पहिला घटस्फोट झाल्याशिवाय दुसरे लग्न करता येत नाही. अस असताना देखील दुसऱ्या महिलेशी आपण संबंध ठेवतो, मुलं होतात, त्यांना आपलं नाव देतो, हे कायद्याविरुद्ध आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यायला हवा. मुंडे एक संवदेनशील नेते आहेत. त्यामुळे ते स्वत: हून राजीनामा देतील. त्यांनी राजीनामा दिला नाही, तर शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंडेंचा राजीनामा घ्यावा, अन्यथा भाजप रस्त्यावर उतरेल, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.