पुण्याप्रमाणे “पिंपरी-चिंचवड दर्शन’ बससेवा

पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या शहरामध्ये धावणाऱ्या पुणे दर्शन बससेवेप्रमाणे आता पिंपरी-चिंचवडमध्ये देखील बस सुरू करण्यात येणार आहे.

पुणे शहरामध्ये “पुणे दर्शन’ ही बससेवा पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. यासह पीएमपीएमएललाही उत्पन्न वाढीमध्ये देखील बसचा हातभार लागत आहे. या बससेवेच्या धर्तीवर अर्थात “पुणे दर्शन’ प्रमाणे “पिंपरी-चिंचवड दर्शन’ सुरू करण्याचा प्रशासन विचार करत असून लवकरच याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

ही सेवा सुरू करण्याबाबत पुणे मुख्यालयामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे प्रशासनाने नमूद केले. त्याचबरोबर “पिंपरी-चिंचवड दर्शन’ बस सेवेच्या माध्यमातून दाखविण्यात येणारी स्थळे, बसचा मार्ग देखील लवकरच निश्‍चित करण्यात येणार आहे.

पुणे शहरातील ऐतिहासिक स्थळे पर्यटकांना दाखविणाऱ्या “पुणे दर्शन’ या बससेवेच्या धर्तीवर “पिंपरी-चिंचवड’मधील बससेवा सुरू करत आहोत. पिंपरी-चिंचवडला पुणे दर्शनप्रमाणे बससेवा असावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. त्यामुळे आम्ही सेवा सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही करत आहोत.
– नयना गुंडे, व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here