नवी दिल्ली – जागतिक संकेतानुसार दिल्ली सराफात सोने आणि चांदीच्या दरात घट नोंदली गेली. सोन्याचा दर 225 रुपयांनी कमी होऊन 50,761 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.
तयार चांदीचा दर 315 रुपयांनी कमी होऊन 54,009 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. जागतिक बाजारात मात्र सोन्याचा दर वाढून 1,702 डॉलर व चांदीचा दर 18.18 डॉलर प्रति औंस या पातळीवर होता.
एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, महिन्याच्या अखेरीस अमेरिकेच्या व्याज दरवाढीची घोषणा होणार आहे. नेमकी किती व्याजदर वाढ होईल याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. त्यानंतर विविध बाजारात काही प्रमाणात स्थिरता येण्यास मदत होणार आहे.