कोल्हापूरजवळ भीषण अपघात; ३ ठार

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज-चंदगड रोडवर कंटेनर आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. गडहिंग्लज जवळच्या हरळी साखर कारखान्याजवळ झालेल्या अपघातात ३ जण जागीच ठार झाले असून २ जण गंभीर जखमी झाले आहेत. मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघातातील जखमींवर गडहिंग्लज च्या उपजिल्हा रुग्णालय उपचार सुरू असून मृत आणि जखमी कोल्हापूर आणि बेळगाव परिसरातील रहिवाशी आहेत. अपघातच कारण अद्याप अस्पष्ट असून गावकरी, पोलीस आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्याकडून बचावकार्य सुरू केलं आहे.

सुरज ब्रह्मा पाटील (रा. बेळगाव), सुरज जयवंत टिप्पे (वय 25, रा. कागल), विश्वजीत पांडुरंग पाटील (वय 22, रा.  शिरगाव) अशी मृतांची नावे आहेत. तर संदेश सदाशिव टिप्पे (वय 21, रा.तमनाकवाडा), अजिनाथ साहेबराव खुडे (रा. बीड) अशी जखमींची नावे आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.