वाघोली : अवजड वाहनांना असणाऱ्या बंदीच्या काळात पुणे-नगर महामार्गावर वाघोली येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या समोर डंपरच्या धडकेत तरुणी गंभीर जखमी झाल्याच्या अपघातात चालकासह मालकावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
10 ऑक्टोबरच्या सकाळी साडे आठच्या सुमारास अपघात घडला होता. मनीषा मंडलिक (रा. वाघोली) ही तरुणी गंभीर जखमी झाली होती. तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार डंपर चालक अनिल तुरुकमारे तर प्रतिबंधित रोडवर वाहन चालविण्यासाठी प्रोत्साहित करणारे मालक पंकज सौगांधी यांच्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरुवातीला चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर चालकासह मालकावर गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.