मंचर-आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले गजानन किसन मुंढे (वय 35) यांच्या पोटात अचानक दुखू लागल्याने उपचारादरम्यान त्यांचा गुरुवारी (दि. 14) रात्री मृत्यू झाला आहे. मंचर पोलिसांनी गजानन मुंढे यांच्या आकस्मित मृत्युची नोंद केली आहे.
राजुर (ता. जुन्नर) येथील गजानन मुंढे हे घोडेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांना गुरुवारी साप्ताहिक सुट्टी होती. गजानन मुंढे यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना जुन्नर येथील डॉ. शिंदे यांच्याकडे उपचारासाठी नेण्यात आले; परंतु तेथे आवश्यक उपचार होऊ शकले नाही. अधिक उपचारासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले. मंचर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी गजानन मुंढे यांना तपासले असता ते मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बाळु दिगंबर मुंढे यांनी गजानन मुंढे यांच्या मृत्यूबाबत मंचर पोलिस ठाण्यात खबर दिली.