पॅरिस – फ्रेंच अब्जाधीश, राजकारणी आणि डॅसॉल्ट विमान बनविणाऱ्या कुटूंबाचे वंशज असलेले ऑलिव्हियर दासॉल्ट हे रविवारी हेलिकॉप्टर अपघातात ठार झाले. त्यांचे हेलिकॉप्टर वायव्य फ्रान्समधील डॅव्हविलेच्या अपमार्केट कोस्टल रिसॉर्टजवळ कोसळले, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.
“ऑलिव्हियर दासॉल्ट यांना फ्रान्स विशेष आवडत असे. फ्रान्समधील उद्योगविश्वाचे नायक, स्थानिक खासदार, हवाई दलात राखीव कमांडर असलेल्या दासॉल्ट यांनी आयुष्यभर आपल्या देशाची सेवा केली.’ अशा शब्दात फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी दासॉल्ट यांना आदरांजली वाहिली आहे. दासॉल्ट यांचा मृत्यू म्हणजे मोठी हानी झाल्याचे म्हणून मॅक्रॉ यांनी दासॉल्ट कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे.
दासॉल्ट कुटुंबाचा उद्योगाचा पसारा एरोनॉटिक्स, संरक्षण, लिलाव, वाइन आणि मीडियासह अनेक क्षेत्रात पसरलेला आहे. दासॉल्ट एव्हिएशन ग्रुप गेली 70 वर्षे फ्रेंच विमान उत्पादक कंपनी आहे आणि त्यांच्या पाठोपाठ फाल्कन प्रायव्हेट जेट, मिराज लढाऊ विमाने आणि सर्वात अलीकडील अत्याधुनिक राफेल लढाऊ विमानांचा क्रमांक लागतो. 2020 मध्ये ऑलिव्हियर दासॉल्ट हे सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्याचे फोर्ब्स मासिकाने म्हटले होते. त्यांची संपत्ती 5 अब्ज युरो इतकी असल्याचा अंदाज आहे. त्यांच्या तिन्ही भावंडांमध्येही तेवढीच संपत्ती असल्याचा अंदाज आहे.