मुंबई – राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या वाहनाला अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा अपघात आज रात्री 8 वाजता मुंबईमध्ये कार्यक्रमाला जात घडला.
यात उदय सामंत यांच्या विशेष सुरक्षा पथकातील वाहनाचा ब्रेक फेल झाल्यानंतर हे वाहन उदय सामंत यांच्या वाहनावर आदळले.
या अपघातात उदय सामंत यांना मुका मार लागला असून त्यांना कोणतीही मोठी दुखापत झालेली नाही. यावेळी उदय सामंत एकटेच होते. या अपघातात उदय सामंत यांचे सुरक्षा अधिकारी जखमी झाले आहेत.
त्यांना मुंबईतील कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.