पिंपरी : वेगाचा थरार, दुकानात शिरली मोटार

पिंपरी(प्रतिनिधी) – चालकाचा ताबा सुटल्याने मोटार रस्त्यालगत असलेल्या दुकानात शिरली. मोटारीमधील चार अल्पवयीन मुलांना किरकोळ जखम झाली. ही घटना सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास पुनावळे येथे घडली.

हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव मोटारीवरील चालकाचा ताबा सुटल्याने मोटार दुकानात शिरून पलटी मारून पुन्हा सरळ झाली. या अपघातात मोटारीतील तीन अल्पवयीन मुले किरकोळ जखमी झाली. मात्र रस्त्यालगत असलेल्या फर्निचरच्या दुकानाचे मोठ्या नुकसान झाले आहे.

सुदैवाने जीविहानी झालेली नाही. मोटारही अल्पवयीन चालवत असल्याची चर्चा पुनावळे परिसरात सुरू होती. अपघात झाल्यानंतर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.