उर्से-चाकण राष्ट्रीय मार्गावर अपघाताचा धोका

वडगाव मावळ – उर्से-चाकण राष्ट्रीय मार्ग व पुणे-मुंबई महामार्गावर नादुरुस्त झाल्यानंतर बंद पडलेल्या अवजड वाहनांमुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. रस्त्यावर उभी करण्यात येणारी ही वाहने त्वरित हटविण्याची मागणी नागरिक, वाहन चालकांकडून करण्यात येत आहे.

उर्से-चाकण राष्ट्रीय मार्गावर माउंटसेंट शाळेसमोर लोखंडी कॉईलची वाहतूक करणारा कंटेनर व पुणे-मुंबई महामार्गावर वडगाव-तळेगाव फाटा चौकाजवळ लोखंडी ऍगल घेऊन जणारे वाहन अशी दोन वाहने गेल्या दोन दिवसांपासून उभी आहेत. या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. त्या ठिकाणी रस्ता अरुंद झाल्याने वाहतूक कोंडीला निमंत्रण मिळत आहे. तसेच याठिकाणी अपघात घडत आहेत. या वाहनांकडे पोलिसांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.