आत्तापर्यंत पावसामुळे चौघांचा बळी

पुणे – जिल्ह्यात मागील महिनाभरापासून झालेल्या पावसामुळे चार जणांचे बळी गेले असून, 70 घरे पडली असल्याची घटना घडल्या आहेत. जिल्ह्यात पावसामुळे 1 जूनपासून आतापर्यंत झालेल्या दुर्घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे.

भुगाव येथे मिलिंद किंगे हे ओढ्यात वाहून गेल्याची दुर्घटना घडली. इंदोरी येथे प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाची धडक बसल्याने ज्ञानेश्वर चव्हाण हे नदीपात्रात पडून वाहून गेल्याची घटना घडली आहे. भोर येथील नाझरे गावात खंडेराव खोपडे हे ओढ्यातील पाण्यात वाहून गेले. याशिवाय भीमाशंकर मंदिराच्या मागील कुंडामध्ये एकजण बुडाला. संबंधित व्यक्ती उत्तरप्रदेशमधील रहिवाशी असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. पावसामुळे पडझडीच्याही घटना घडल्या असून, 70 ठिकाणी घरे पडली आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)